ब्राह्मण समाजाबद्दलचा अहवालही आम्ही पाठविणार : चंद्रकांत पाटील
आता जो समाज आरक्षणाची मागणी करेल, अशा प्रत्येक समाजाबद्दलचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे सादर करणार आहोत. ब्राह्मण समाजाबद्दलचा अहवालही आम्ही पाठविणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदिली आहे.
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. यावर पाटील म्हणाले की, निवडणूक तोंडावर आली, म्हणून आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही. कायद्याच्या पातळीवर सक्षम असलेले व टिकणारे आरक्षण दिले आहे. निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे. सर्व समाजघटकांना कायद्याच्या पातळीवर समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.