रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (12:16 IST)

आलोक वर्मा राजकारणात उतरणार?

दक्षिण दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता
केंद्रीय गुन्हे अन्वेषण या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेत सध्या उलथापालथ सुरु आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुंळे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सध्या पदावरुन हटवण्यात आले आहे. सध्या ए. नागेश्वर राव यांना हंगामी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. परंतु, आलोक वर्मा सरकारच्या या कारवाईमुळे नाराज असून त्यांनी याविरोधात सर्वोच्च   न्यायालयातही धाव घेतली होती. सध्या सीबीआयमध्ये तपास सुरु आहे. याचदरम्यान आलोक वर्मा हे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.
 
आलोक वर्मा यांनी दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे, असे भाजपच्या विरोधी गटाकडून बोलले येते. भाजप विरोधकांच्या मते, वर्मा मोदी सरकारच्या भ्रष्टाचार विरोधातील लढाईचे प्रतीक बनू शकतात. भाजप सरकारवर विरोधी पक्ष नोटाबंदी, राफेल करार वरुन भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. वर्मा यांचे त्रि आणि अंलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी राजेश्वरसिंह हेही राजकारणात रुची असणारे आहेत. 
 
2017 मध्ये तर त्यांच्या हितचिंतकांनी राजेश्वरसिंह यांना नोएडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्नही केला होता. सध्या ज्या पद्धतीने वर्मा यांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यावरुन ते राजकारणात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.