1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नीरव मोदी, मेहुल चोकसी विरोधात अजामीनपात्र वॉरंट

business news
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसीविरोधात सीबीआय कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. चौकशीला हजर राहण्यासंबंधी बजावलेला समन्स या दोघांनीही फेटाळल्यानंतर सीबीआयने कडक पावले उचलली आहेत. १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात हिरे व्यावसायी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी प्रमुख आरोपी आहेत. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. वॉरंट जारी झाल्याने, आता या दोघांविरुद्ध इंटरपोलकडून ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी होण्याचा मार्गही सोपा झाला आहे.
 
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबीच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मोठा घोटाळा केला. बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने त्यांनी बँकेला तब्बल 13 हजार कोटींना चुना लावला. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयने चौकशीसाठी नीरव आणि चोक्सीला नोटीस पाठवली होती. मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला.