शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जकार्ता , सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (13:03 IST)

इंडोनेशियाच्या समुद्रात विमान कोसळले, प्लेनचा पायलट भारतीय होता

इंडोनेशियाची राजधानी जर्कातामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लायन एअरवेजचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससहित १८८ प्रवासी प्रवास करत होते.
 
लायन एअरवेजचे जेटी ६१० हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. ६.२० वाजता या विमानाने उड्डाण केले व १३ मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटला. यानंतर थेट विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. या विमानात क्रू मेंबर्ससहित १८८ प्रवासी प्रवास करत होते.