शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (17:28 IST)

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे केले जाहीर अभिनंदन

एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यावेळी  मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे जाहीररित्या अभिनंदन केले. वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास कामांच सोमवारी भुमिपुजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते.
 
दरम्यान, उद्धव यांनी मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी त्यांचे कौतुक केले होते. उद्धव ठाकरेंना रामाचे आशिर्वाद मिळतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे युतीतील या दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.