1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (08:59 IST)

मराठा आरक्षण : आम्ही पूर्ण केला शब्द - मुख्यमंत्री फडणवीस

Maratha Reservation
राज्यात सुरु असलेले मराठा आरक्षण वातावरण थोडे निवळले असून त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठे काम केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारनं जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं असून. आम्ही लोकांना बांधील आहोत अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सहभागी लोकांनी, पक्षांनी या प्रश्नावर पाठिंबा दिला त्या सर्वांचं हे श्रेय आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की , आरक्षणाचा निर्णय घेताना सरकारला काळजी घ्यावी लागली असून, आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टीकावं यासाठी ज्या काही तरतूदी करणं आवश्यक होतं त्या सर्व तरतूदी सरकारनं केल्या आहेत आणि यापुढे हे आरक्षण टिकावं यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. असं आश्वासनही त्यांनी दिले आहे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्याला धक्का लागणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली असून, या  प्रकारचं कलमच या विधेयकात टाकण्यात आल्यामुळं ओबीसींचा कोट्याला धक्का लागणार नाही. काही लोक मुद्दाम या विषयावर फुट पाडण्याचा प्रयत्न करताहेत अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक बाजू पूर्ण जिंकली असे सध्या तरी आहे.