बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (16:19 IST)

उद्धव ठाकरे कुटुंबियांसह अयोध्येत दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबियांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. या ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. अाता त्यांच्या येथे होणाऱ्या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे. अयोध्येच्या राम मंदिरासाठी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबिय अयोध्येत दाखल झाले आहेत. सायंकाळी शरयूची महाआरती उद्धव ठाकरे यांच्याहस्‍ते होणार आहे. अयोध्या दौर्‍याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्‍नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे गेले आहेत. ठाकरे कुटुंबाचा उत्तर प्रदेशमधील दुसरा दौरा आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असताना न्यायालयाच्या कामासाठी एकदा गेले होते तर सहाराचे सुब्रतो रॉय यांच्या लग्नासाठीही एकदा ते गेले होते. 
 
अयोध्येतील लक्ष्मण किला याच ठिकाणी शनिवारी संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे या सोहळय़ाची जय्यत तयारी झाली असून याच ठिकाणी अयोध्येतील संतमहंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देणार आहेत. त्यानंतर शरयू तटावर ते सायंकाळी 5 वाजता आरती करणार आहेत.