गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवनेरी गडावर उद्धव ठाकरे यांचा प्रश्न, मंदिर कधी उभारणार

उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे शिवनेरी गडावरील मातीचा कलश घेऊन अयोध्या जाणार आहेत आणि कलश राम जन्मभूमीच्या महंत यांना सोपवणार आहेत. यासाठीच उद्धव ठाकरे हे गुरुवारी शिवनेरी गडावर पोहोचले आणि शिवरायांचे दर्शन घेतले. 
 
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या पोहण्यापूर्वीच शिवसैनिकांची एक टीम अयोध्या पोहचून चुकली आहे. अयोध्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख भाजपवर टीका करत म्हणाले की 15 लाखाप्रमाणे राम मंदिर देखील केवळ भुलावा आहे. 
 
उद्धव ठाकरे अयोध्या येथे रामलला यांचे दर्शन आणि सरयू तटावर पूजा अर्चना देखील करतील. अयोध्या जाण्यापूर्वीच उद्धव यांनी एक नारा दिला आहे ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर-फिर सरकार‘.
 
इकडे शिवनेरी येथे उद्धव यांनी म्हटले की निवडणुका आल्या की राम मंदिर मुद्दा आठवतो, प्रत्यक्षात मंदिर कधी उभारणार, असा प्रश्न त्यांनी भाजपला केला आहे.