मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (15:51 IST)

फुकट इंटरनेट ने पोट भरत का ? रेशन द्या ना फुकट - उद्धव ठाकरे

जियो ने केबल क्षेत्रात पाय ठेवताच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जियो जरी ग्राहकांसाठी खूप फायद्याचे असले तरी अनेक केबलचालक बेरोजगार होणार आहे. त्यामुळे मोठा राजकीय वाद सुरु झाला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख यांनी केबल चालकांच्या मागे उभे राहिले असून, रिलायन्स सोबत संघर्ष सुरु झाला आहे. जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटत असून केबल चालकांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाहीच. इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा. मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. ना ? करू शकाल असे असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 
 
जिओ फायबरविरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या असून केबल मालकांच्या संघटनेने बोलावलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रिलायन्सवर जोरदार टीका केली आहे. 
 
इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे. मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा  वाटा. शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहणार. भाजी-भाकरी डिडिटली कशी देता येईल. लोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट कसे भरेल. कोणाला व्यवसाय करण्यास आमचा विरोधा नाही. आणखी 10 जणांनी यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  
 
प्रत्येक गोष्ट लढूनच मिळवायची आमची तयारी आहे- उद्धव ठाकरे
केबल चालकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही
फुकट इंटरनेटमुळे पोट भरत नाही- उद्धव ठाकरे
शिवसेनेचा केबल संघटनांना पाठिंबा
मोफत सेवा म्हणजे माऊस ट्रॅप- उद्धव ठाकरे
मोदींनी जिओकडून शिकावे, पेट्रोल, रेशन सर्व मोफत द्यावे- उद्धव ठाकरे
जिओची मक्तेदारी नको, केबलचालक संघटनांची मागणी
केबलचालकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात प्रमुख केबलचालकांची बैठक