सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

राखीचा सण साजरा करताना राशीप्रमाणे या रंगाचे कपडे परिधान करा

ज्योतिष्याप्रमाणे कपड्याचे रंग आणि यश व सुख-समृद्धीचे आपसात संबंध आहे. शुभ मुर्हूतावर राशीप्रमाणे शुभ रंगाचे परिधान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
 
* मेष, सिंह, वृश्चिक : मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळचा प्रिय रंग लाल आहे. तसेच सिंह राशीचा स्वामी सूर्य असून त्याचा प्रिय रंग पिवळा आणि लाल आहे. म्हणून या राशीच्या लोकांनी सणाच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालायला हवे.
 
* वृषभ, कर्क, तुला : वृषभ आणि तुला यांचा ग्रह स्वामी शुक्र असून त्याचा प्रिय रंग पांढरा आहे. आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र असून याचाही प्रिय रंग पांढरा असल्याने या राशीच्या लोकांनी पांढर्‍या रंगाचे किंवा हलके शेड्सचे कपडे निवडायला हवे.
 
* मिथुन, कन्या : या दोन्ही राश्या बुध ग्रहाच्या असून त्याचा प्रिय रंग हिरवा आहे. या राशीच्या लोकांनी शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे.



* धनू, मीन : धनू आणि मीन राशीचा ग्रह स्वामी गुरु आहे आणि याचा प्रिय रंग पिवळा आहे. पिवळा रंग घातल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात यश आणि सुख येतं.
 
* मकर, कुंभ : मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी असून शनीला निळा आणि गडद रंग प्रिय आहे. काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणे या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल.