शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी

मूलांक ९ हा ऊर्जा आणि शक्तिचा अंक आहे. मंगळ याचा स्वामी ग्रह आहे. मंगळ साहस, शौर्य आणि दृढ इच्छा
शक्ती यांचे प्रतीक आहे.  कठोर शिस्तीनुसार वर्तन करणे, पराजयाचा विचार न करणे आणि न घाबरणे ही मूलांक ९ची वैशिष्टय़े होत. मूलांक ९ला कितीनेही गुणलं तरी त्या संख्येची बेरीज नऊच येते. अर्थातच, मूलांक ९ असलेली व्यक्ती परिवर्तनशील नसते. 
 
स्वरुप- मूलांक ९चे स्वरुप आकर्षक असते. सुरुवातीला ते स्वतच्या रंग, रुपाबाबत निष्काळजी असतात; पण नंतर थोडय़ाशा प्रयत्नानेही त्यांचे स्वरुप उजळते. त्यांची शरीरयष्टी सुदृढ असते. तरुण वयात या व्यक्ती सौंदर्यस्पर्धामध्येही यशस्वी होतात.
 
स्वभाव- या लोकांचा स्वभाव आक्रमक, जिद्दी, शिस्तप्रिय आणि संयमी असतो. त्यांच्या स्वभावात विनम्रता नसते. कट-कारस्थानं न करण्याचा स्वभाव असतानाही कोरडय़ा स्वभावामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. व्यापक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मूलांक ९च्या व्यक्ती इतरांना सहज माफ करत नाहीत तसंच माफी मागायलाही त्यांना जमत नाही. पण इतरांना साहाय्य करण्याची यांची मानसिकता असते. 
 
पुढे पहा व्यक्तींचा व्यक्तिमत्व, भाग्यशाली तिथी आणि भाग्यशाली दिवस
व्यक्तिमत्व- यांचे व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असते. कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत. यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते. यांच्यात आक्रमकपणा आणि क्रोध सहज दिसतो. संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. चलाखपणा त्यांना जमत नाही. दूरदृष्टी त्यांच्यात क्वचितच आढळते. मूलांक ९ हा सत्ता, शक्ती, शौर्य आणि साहसाचा अंक आहे. शासन आणि प्रशासकीय प्रवृत्ती त्यांच्यात सहज आढळते. ते सहज संतापतात आणि भाषेवरचं नियंत्रण गमावून बसतात. पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही करतात. इतर लोक यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात, परिणामी त्यांना खूप शत्रू निर्माण होतात.  
  
भाग्यशाली तिथी- प्रत्येक महिन्याची ३, ६, ९, १२, १५, १८, २१, १४, २७ आणि ३० तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.
 
भाग्यशाली दिवस- प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार आणि गुरुवार तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. 
 
पुढे पहा शुभ रंग, भाग्यशाली वर्ष, शुभ अंक आणि भाग्यशाली दिशा
शुभ रंग- ऑरेंज रंग तुमच्यासाठी अतिशुभ आहे. याशिवाय पिवळा, गुलाबी, क्रीम व सफेद रंग शुभ आहेत. महत्त्वपूर्ण कामांसाठी लाल रंगाचा वापरही शुभ ठरेल. 
 
भाग्यशाली वर्ष- ९, १२, १५, १८, २१, २४, २७, ३०, ३३, ३६, ४२, ४५, ५१, ५४ आणि ६०वे वर्ष तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरतील.
 
संबंधांसाठी शुभ अंक- मूलांक ३ आणि ४ यांच्याबरोबर तुमचे चांगले सामंजस्य राहील. मूलांक १, ४ आणि ८यांपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. 
 
भाग्यशाली दिशा- दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिशा तुमच्यासाठी शुभ ठरतील.
 
पुढे पहा करिअर, भाग्यशाली देव, भाग्य रत्न आणि कल्याणकारी मंत्र
भाग्यशाली करिअर- प्रशासकीय कार्ये, सैन्य, शल्यक्रिया, धातू आणि अग्नीशी संबंधित कार्ये, वकिली, कायदेविषयक, अभिनय, जमीन खरेदी-विक्री, बिल्डिंग मटेरियलचा पुरवठा करणे तुमच्यासाठी यशस्वी करिअर ठरू शकते. 
 
भाग्यशाली देव- मंगळ, भूमी, सूर्य आणि शक्ती यांच्या उपासनेपासून तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. श्रावणात शिव आणि शक्तीची आराधना केल्यास तुमची खूप उन्नती होईल.
 
भाग्य रत्न- मूंगा आणि माणिक हे आपले भाग्य रत्न आहे. ५-५ कॅरेटच्या वजनाची रत्ने सोन्यात धारण करा. मानसिक शांतीसाठी चांदीमध्ये मोती धारण करणे चांगले राहील. 
 
कल्याणकारी मंत्र- ॐ अंगार काय नम
ॐ हौं जूं स
ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मै नम 
 
कल्याणकारी उपाय- संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. प्रश्नणायाम करावा. दररोज मातीच्या भांडय़ात तूपाचा दीवा लावा. चांदीचा चमचा वापरावा. स्टील आणि लोखंडाच्या चमच्यांचा वापर कमीतकमी करा.