शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2019 (10:29 IST)

चंद्र ग्रहण 16 जुलै 2019 : बनणार आहे फारच दुर्लभ संयोग

या वर्षाचा दुसरा चंद्रग्रहण 16-17 जुलै 2019ला आहे. हा आंशिक रूपेण असेल आणि भारतात दिसेल. याची वेळ 16 जुलैची रात्री अर्थात 01:31 ते सकाळी 04:31 पर्यंत राहील. या ग्रहणाचा प्रभाव भारतासोबत आस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेत होईल.  
 
उत्तराषाढा नक्षत्रात लागणारा हा ग्रहण धनू राशीत राहील. 2019 मध्ये एकूण 2 चंद्रग्रहण आहे, ज्यात पहिला चंद्रग्रहण 21 जानेवारीला होऊन गेला आहे. हा पूर्ण चंद्र ग्रहण होता आणि आता जुलैमध्ये वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्र ग्रहण लागणार आहे.  
 
यंदा गुरू पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण राहणार आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी लागोपाठ दुसर्‍या वर्षी चंद्रग्रहण लागत आहे. या अगोदर 27 जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण होता. कारण ग्रहणाच्या आधी वेध लागतात. म्हणून गुरू पौर्णिमेचे कार्यक्रम वेध लागण्याअगोदरच करणे गरजेचे आहे.  
 
असे मानले जाते की वेधच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य नाही करायला पाहिजे. एक दुर्लभ योग यंदा चंद्र ग्रहणात बनत आहे.  
 
वर्ष 1870 मध्ये 12 जुलै अर्थात 149 वर्ष अगोदर बनला होता. जेव्हा गुरू पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होता आणि त्याच वेळेस शनी, केतू आणि चंद्रासोबत धनू राशीत स्थित होता. सूर्य, राहूसोबत मिथुन राशीत होता.  
 
ग्रहणाच्या वेळेस ग्रहांची स्थिती : शनी आणि केतू ग्रहणाच्या वेळेस धनू राशीत राहतील. ज्यामुळे ग्रहणाचा प्रभाव जास्त पडेल. सूर्यासबोत राहू आणि शुक्र देखील राहणार आहे. सूर्य आणि चंद्र चार विपरीत ग्रह शुक्र, शनी, राहू आणि केतूच्या घेर्‍यात राहतील. या दरम्यान मंगळ नीचचा राहणार आहे.  
 
ग्रहांचा हा योग आणि यावर लागणारा चंद्र ग्रहण तणाव वाढवू शकतो. ज्योतिष्यानुसार भूकंपाचा धोका राहील आणि इतर अन्य प्राकृतिक विपदांमुळे नुकसान होण्याची शक्यता देखील राहील.