मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By

Lunar Eclipse 2023 : काही नियम पाळा, काही गोष्टी टाळा

lunar eclipse rules
1. ग्रहण काळात संयम ठेवत जप-ध्यान केल्याने अनेक पटीने फळ प्राप्त होतं.
 
2. ग्रहण काळात गायीला चारा, पक्ष्यांना धान्य, गरजू व्यक्तीला वस्त्र दान केल्याने पुण्य मिळतं.
 
3. चंद्र ग्रहणात 3 प्रहर म्हणजे 9 तासापूर्वी भोजनाचा त्याग करावा. वयस्कर, मुलं आणि आजारी दीड प्रहर अर्थात 4.30 तासापूर्वीपर्यंत सेवन करू शकतात.
 
4. ग्रहण वेध लागण्यापूर्वी ज्या पदार्थांमध्ये कुश किंवा तुळशीचे पानं घातले जातात ते पदार्थ दूषित होत नाही. शिजलेलं अन्न त्याग करून गाय, कुत्र्याला घालून ग्रहण सुटल्यावर अंघोळ केल्यानंतर नवीन भोजन तयार करावं.
 
5. ग्रहण वेधाच्या सुरुवातीला तीळ किंवा कुशमिश्रित पाणी अती आवश्यक परिस्थितीत वापरावं आणि ग्रहण सुरू झाल्यावर ग्रहण सुटेपर्यंत अन्न, पाण्याचं सेवन करू नये.
 
6. ग्रहणाच्या स्पर्श होत असलेल्या काळात स्नान, मध्य काळात होम, देव पूजन आणि श्राद्ध आणि शेवटल्या काळात वस्त्र सहित स्नान करावं. स्त्रिया केस धुतल्याविना देखील स्नान करू शकतात.
 
7. ग्रहण पूर्ण झाल्यावर ज्याचं ग्रहण असेल, त्याचं शुद्ध बिंब बघून भोजन करावे.
 
8. ग्रहण काळात स्पर्श केलेले वस्त्र इतर वस्तूंच्या शुद्धी हेतू त्याला धुतल्या पाहिजे आणि स्वत:ही वस्त्रासकट स्नान करावं.
 
9. ग्रहणाच्या दिवशी पाने, दूब, लाकडी आणि फुलं तोडू नये. केस विंचरू नये आणि वस्त्र पिळू नये.
 
10. ग्रहणात ताळा उघडणे, झोपणे, मलमूत्र त्याग, मैथुन आणि भोजन हे सर्व कार्य वर्जित आहे.
 
11. ग्रहणात कोणतेही शुभ व नवीन कार्य सुरू करू नये.
 
12. ग्रहणात गुरु मंत्र, ईष्टमंत्र किंवा देवाचा जप अवश्य करावा.
 
13. चंद्र ग्रहणात केलेलं पुण्य कर्म (जप, ध्यान, दान इतर) 1 लाख पट आणि सूर्य ग्रहणात 10 लाख पट फळ प्रदान करणारं असतं. तसेच गंगाजल जवळ असल्यास चंद्र ग्रहणात 1 कोटी पट आणि सूर्य ग्रहणात 10 कोटी पटाने फलदायी असतं.
 
14. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी.