मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 29 जुलै 2020 (11:14 IST)

Friendship Day : चार राशीच्या लोकांशी मैत्री असते अतूट, जन्मभर एकमेकांचा साथ देतात

2 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आहे. या प्रसंगी प्रत्तेकाला आपल्या मित्रांसाठी काही प्लान करायचा असतो. तसं तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या जीवनात एक खरा मित्र असायला पाहिजे जो प्रत्येक परिस्थितित त्याच्यासोबत उभा असावा. पण काही नशीबवान लोकच असतात ज्यांच्यासोबत असे होते. तर जाणून घेऊ राशीनुसार कोणत्या राशीच्या लोकांसोबत मैत्री केल्याने तुमचे भाग्य उजळू शकतं.
 
मेष राशी- मेष राशी असणारे लोक पूर्ण प्रामाणिकपणे आपली मैत्री निभावतात. हे लोक भांडण झाल्यानंतर देखील आपली मैत्री कायम ठेवतात. तसेच आपल्या मित्रांसोबत मनोरंजनासाठी नेहमी बाहेर जात राहतात.
तूळ राशी- हे लोक जास्त लोकांशी मैत्री करण्यात भरवसा ठेवत नाही. यांच्या मित्रांची संख्या कमी असते पण आपल्या मैत्रीला पूर्ण प्रामाणिकरीत्या निभवतात. मनाचे साफ आणि आपली गोष्ट सर्वांसमोर मांडणारे असतात.
 
धनू राशी- ह्या राशीचे लोक फारच खुशमिजाज असतात. यांच्यासोबत राहणारे लोक कधीही दुखी राहत नाही. जेथे राहतात तेथील वातावरण चांगले राहते. समोरच्याच्या भावनांना चांगल्यारित्या समजण्याची क्षमता यांच्यात असते.
 
कर्क राशी- या राशीचे लोक फारच चांगले मित्र बनू शकतात. यांच्या स्वभाव बाकी लोकांपेक्षा वेगळा असतो. पण यांच्यात एक कमी असते की हे आपल्या मित्रांचा वाढदिवस नेहमी विसरतात.