शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (08:39 IST)

शिव पुराणातील या 10 गोष्टी आयुष्यात खूप कामी येतील

शिव पुराण भगवान शंकर आणि त्यांचा अवताराशी निगडित आहे. त्यात शिव भक्ती, शिव महिमा आणि शिवाचे संपूर्ण जीवन चरित्र वर्णिले आहे. त्याच बरोबर ज्ञान, मोक्ष, उपास, तप, जप यांचा मिळणाऱ्या फळांचे देखील वर्णन आढळतं. शिव पुराणामध्ये सहस्त्र ज्ञानवर्धक आणि भक्ती विषयक लिहिले आहे पण आम्ही फक्त 10 चे वर्णन येथे करीत आहोत.
 
1 धन संग्रह : चांगल्या मार्गाने पैसे साठवा आणि त्याचे 3 भाग करून एक भाग धन वृद्धीसाठी, एक उपभोगासाठी आणि एक भाग धर्म आणि कर्म यात घालवा. असे केल्यास जीवनात यशप्राप्ती होते.
 
2 रागाचा त्याग : राग कधी करू नये आणि कोणालाही राग येईल असे कधी बोलू नये. रागाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने आयुष्यात मोठे संकट उभारतात.
 
3 अन्नाचा त्याग  : शिवरात्रीचा उपास केल्याने व्यक्तीला आनंद आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि पुण्य मिळते. पुण्य केल्याने भाग्योदय होतो आणि व्यक्ती सर्व सुख प्राप्त करतो. 
 
4  संध्याकाळ : सूर्योदयापासून सूर्यास्ताचा काळ भगवान शंकराचा आहे. जेव्हा ते आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्रेलोक्याला बघतात आणि आपल्या नंदी आणि इतर गणाबरोबर फिरत असताना जर एखादी व्यक्ती कठोर शब्द बोलतात, कलह किंवा क्रोध करतात, सहवासात असल्यावर, जेवण करीत असल्यास, प्रवास करीत असल्यास किंवा कोणतेही पाप कर्म करीत असल्यास त्याचे अनिष्ट होते.
 
5 खरं बोलणे : माणसांसाठी सर्वात मोठा धर्म आहे खरं बोलणं किंवा सत्याचे समर्थन करणं आणि सर्वात मोठं अधर्म आहे खोटं बोलणं किंवा असत्याचे समर्थन करणं.
 
6 निष्काम कर्म : एखादे काम किंवा कर्म करीत असताना व्यक्तीला स्वतःचा साक्षीदार बनायला हवं. ती व्यक्ती स्वताच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी स्वतःच जवाबदार असते. आपल्या कामाकडे कोणाचेही लक्ष नाही असा विचार करता कामा नये. मनात असे विचार केल्यावर माणूस वाईट कर्म करू शकणार नाही. माणसाला मन, वचन आणि कृतीने किंवा कर्माने वाईट करू नये.
 
7 अनावश्यक इच्छांचा त्याग करणं : माणसाच्या इच्छेपेक्षा अजून दुसरे दुःख नाही. माणूस इच्छेच्या जाळ्यात अडकतच जातो आणि आपले अवघे आयुष्य नष्ट करतो. म्हणून अश्या अनावश्यक इच्छांना त्यागूनच महासुखाची प्राप्ती होते.
 
8 मोहाचा त्याग करणं : जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितीशी मोह असू शकतो. हा मोह किंवा आसक्तीचं आपल्या दुःखाचे आणि अपयशाचे कारणं असू शकतं. निर्मोही राहून निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्मामुळे माणसाला यश आणि आनंदाची प्राप्ती होते. 
 
9 सकारात्मक कल्पनाशक्ती : भगवान शंकर म्हणतात की कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा महत्वाची आहे. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. स्वप्न देखील एक कल्पनाशक्ती आहे. या आधारावर शिवाने ध्यान करण्याच्या 112 प्रकारांच्या पद्धतींना विकसित केले आहे. म्हणून नेहमी चांगली कल्पना करावी.
 
10 प्राणी नव्हे तर माणूस बना : माणसांमध्ये जो पर्यंत राग, द्वेष, मत्सर, वैराग्य, अपमान, आणि हिंसा या सारख्या पाश्र्विक वृत्ती असल्यावर तो प्राणी बनतो या पासून मुक्त होण्यासाठी भगवंतांची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे. भगवान शिव म्हणतात की मनुष्य हा एक संग्रहालया सारखा आहे ज्यात सर्व प्रकाराचे प्राणी आणि पक्षी आहेत. माणूस अगदी माणसा सारखा नाही. माणसांमध्ये मन जास्त सक्रिय असल्याने त्याला माणूस म्हटले गेले आहे. कारणं माणूस नेहमीच आपल्या मनाच्या ताब्यात असतो.