गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By अनिरुद्ध जोशी|
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2020 (12:34 IST)

द्रौपदीला पाच पती का होते ? महादेवाने कोणते वरदान दिले होते जाणून घ्या.....

द्रौपदी पांचाल देशाचे राजा द्रुपद यांची कन्या होती. यासाठी तिला पांचाली देखील म्हणत असे. राजा द्रुपद यांनी कुरुवंशाचा नायनाट करण्यासाठी यज्ञवेदी मधून तिची उत्पत्ती केली होती. म्हणून तिला यज्ञिक देखील म्हटले जाते. चला द्रौपदीच्या जीवनाशी निगडित एका मोठ्या रहस्यांबद्दल जाणून घेऊ या....
 
महाभारतातील आदिपर्वातील द्रौपदीच्या जन्माच्या कथेत महर्षी वेदव्यास द्रौपदीच्या मागील जन्माची गोष्ट सांगतात. ते सांगतात की पूर्वजन्मी द्रौपदी एक ऋषी कन्या असे. तिच्या वागणुकीमुळे कोणीही तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार करत नसे. त्यावेळी तिने महादेवाची तपश्चर्या केली. महादेवांनी तिला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा ती म्हणे मला सर्वगुणसंपन्न पती द्यावे. तेव्हा शंकराने तिला सांगितले की तू 5 भरतवंशी पतींची पत्नी होशील. त्यावर ती उत्तरली की देवा मी आपल्याकडून एकच नवऱ्याची मागणी केली होती. तेव्हा महादेव म्हणाले की तू पती मिळविण्यासाठी पाच वेळा प्रार्थना केली होतीस त्यामुळे दुसऱ्या जन्मी तुला पाच पतीचं मिळतील.
 
एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार महाभारताशिवाय द्रौपदीला 5 पती होते, पण ते जास्तीत जास्त 14 नवऱ्यांची बायको होऊ शकली असती. त्याच्यामागील कारण द्रौपदीच्या पूर्वजन्मात दडलेले आहे. पूर्वजन्मी द्रौपदी राजा नल आणि राणी दमयंतीची मुलगी नलयनी असे. नलयनी हिने शंकराची तपश्चर्या केली. शंकराने तिला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. त्यावर नलयनीने पुढील जन्मी 14 गुणसंपन्न इच्छित पती मागितले. 
 
शंकराने सांगितले की एकाच व्यक्तीमध्ये हे 14 गुण असणे शक्य नाही. पण नलयनी आपल्या मतांवर ठाम होती. ती हट्टाला पेटली होती. तेव्हा महादेवाने तिला इच्छित वर प्राप्तीचे वर दिले. ह्या वरदानामध्ये जास्तीच जास्त 14 नवरे असतील, आणि दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर कुमारिका बनायची. अशा प्रकारे द्रौपदी एक पंच कन्या बनली. नलयनीचा पुनर्जन्म द्रौपदीच्या रूपात झाला. द्रौपदीने मागितलेले 14 इच्छित गुण 5 ही पांडवांमध्ये होते. युधिष्ठिर धर्माचे ज्ञाता होते, भीममध्ये सहस्त्र हत्तीचं बळ असे, अर्जुन अद्भुत योद्धा आणि शूर पुरुष असे, सहदेव उत्कृष्ट विद्वान असे, तर नकुल कामदेवासारखे सुंदर होते.