मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By अनिरुद्ध जोशी|
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (08:47 IST)

कोण होते महाबली रावणाचे आई वडील, कसे होते रावणाचे बालपण..?

वाल्मीकींच्या रामायणाच्या व्यतिरिक्त रावणासंदर्भात इतर अनेक ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. दक्षिण भारतातील रामायणात महाबली रावणाच्या चारित्र्याचा प्रत्येक पैलू मांडला आहे. रावणाविषयी वाल्मीकींच्या रामायणाच्या व्यतिरिक्त पद्म पुराणात, श्रीमद्भागवत पुराण, कोरमपुराण, महाभारत, आनंद रामायणात, दशावतार्चरीत अश्या अनेक हिंदू ग्रंथांमध्ये तसेच जैन ग्रंथांमध्येही आढळून येतो. चला मग रावणाच्या पालकांबद्दल जाणून घेऊ या. 
 
1 रावणाचे पालक : ब्रह्माजींचा मुलगा पुलस्त्य हे ऋषी होते. त्यांच्या मुलगा विश्रवा झाला. विश्रवाची बायको ऋषी भारद्वाज ह्यांची कन्या देवांगना असे. त्यांच्या मुलगा कुबेर होता. तसेच ह्यांची दुसरी पत्नी दैत्यराज सुमाली याची मुलगी कैकसी असे. हिच्यापासून विश्रावांना 4 अपत्ये रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि एक कन्या शूर्पणखा असे झाले. खरदूषण, कुंभिनी, अहिरावण आणि कुबेर हे रावणाचे सख्खे बहीण भावंड नसे.
 
2 रावणाचा जन्म : वाल्मीकींनी लिहिलेल्या रामायण महाकाव्य पद्मपुराण तसेच श्रीमद्भगवत पुराणानुसार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दुसरे जन्म घेऊन रावण आणि कुंभकर्ण झाले. कैकेसीने अशुभ काळात गर्भधारण करून रावण आणि कुंभकर्ण असे क्रूर राक्षस आपल्या पोटी जन्माला घातले. तुलसीदासने लिहिलेल्या रामचरितमानसमध्ये सांगितले आहे की रावणाचा जन्म एका श्रापामुळे झालेला आहे. नारद आणि प्रतापभानूच्या कथा रावणाच्या जन्मासाठी कारणीभूत असे. 
 
कैकेसीने आपल्या पतीकडून आपण केलेल्या सेवेच्या बदल्यात वर मागितले की माझ्या पोटी असे मुलं जन्माला यावे जे देवांपेक्षा सामर्थ्यवान असे, त्यांना कोणीही पराभूत करू नये. काही काळानंतर तिने एका अद्भुत बालकाला जन्म दिले ज्याचे 10 डोकं आणि 20 हात असे. तिने त्या बाळाला बघताच विचारले की हे असे कसे बाळं झाले. त्यावर ऋषींनी उत्तर दिले की आपणच तर असे बाळं जन्माला यावे म्हणून वर  मागितले होते. या मुलासारखं जगात अजून कोणीच नाही. मग 11 व्या दिवशी त्याचे नाव रावण ठेवण्यात आले.
 
3 रावणाचे बालपण : रावणाचे सर्व बालपण शिक्षण आणि शिकण्यातच गेले. रावण लहानग्या वयातच चारही वेदांमध्ये पारंगत झाले होते. या व्यतिरिक्त त्यांनी आयुर्वेद, ज्योतिष आणि तंत्रविद्ये मध्ये पण सिद्धता मिळवली होती. वयात आल्यावर घोर तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. त्यांना ठाऊक होते की परमपिता ब्रह्मा हे आपले पणजोबा आहेत. त्यांनी सर्वात आधी ब्रह्माची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वर मागितले. ह्यावर ब्रह्मा यांनी त्याला उत्तर दिले, की मी आपणास अमरत्वाचे वर देऊ शकणार नाही, पण मी आपणास भरपूर सामर्थ्य देतो. आपण ज्ञानी आहात, म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. रावणाने शक्ती स्वीकारली आणि निघून गेले. पुढे मग त्यांनी महादेवाची घोर तपश्चर्या केली.