बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By अनिरुद्ध जोशी|

जाणून घ्या रामायणातील सुषेण वैद्य कोण होते...

वाल्मीकींच्या रामायणात रामाची जीवनगाथा आहे. राम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू होत तेव्हा लंकापती रावणाचा मुलगा मेघनादच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणाला शक्ती लागून लक्ष्मण बेशुद्ध पडतात. त्यावेळी लंका मधून तिथले वैद्य सुषेण वैद्य यांना बोलावले जाते. चला जाणून घेऊ या की हे सुषेण वैद्य कोण होते ते...?
 
लक्ष्मणाचे शुद्ध हरपणे  -  राम रावणाच्या युद्धाच्या वेळी मेघनादच्या बाणाने लक्ष्मणाची शुद्ध हरपली. लक्ष्मणाला अश्या अवस्थेत बघून सर्वजण काळजीत पडले आणि निराश होऊ लागले. हे बघून विभीषणाने सर्वांचे सांत्वन केले आणि त्यांना सुषेण वैद्याबद्दल सांगितले. सुग्रीवाने हनुमानाला सुषेण वैद्यांना आणायला सांगितले. सुशील वैद्यांनी लक्ष्मणाला तपासून संजीवनी बुटी आणावयास सांगितले. प्रत्येकाने संजीवनी बुटीच्या शोधात मारुतीला जायला सांगितले. मारुतीला संजीवनी बुटीची ओळख नसल्याने मारुतीने संजीवनीचा डोंगरच उचलून आणला. परत रावणाशी युद्ध करीत असताना लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडतात. लक्ष्मणाला अश्या अवस्थेमध्ये बघून राम विलाप करू लागतात. सुषेण लक्ष्मणाची तपासणी करून सांगतात की लक्ष्मणाच्या तोंडावर मृत्यूचे सावट नाही. त्यामुळे आपणास काळजी नसावी.
 
सुषेण वैद्य कोण होते : सुषेण वैद्य हे वानरराज सुग्रीव ह्याचे सासरे होते. आधी हे लंकेचे राजा रावणाचे राज वैद्य असे. वानरराज सुग्रीवाचे थोरले भाऊ बाली यांची पत्नी तारा सुषेण वैद्य यांची धर्मकन्या होती. बालीच्या मृत्यू नंतर तारांचे लग्न सुग्रीवाशी करण्यात आले. बालीची एक बायको अजून होती तिचे नाव रुमा असे. तसेच अंगद हा बालीचा मुलगा होता.