शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 19 एप्रिल 2020 (21:32 IST)

स्वप्नील जोशीला कुशच्या भूमिकेत, पाहा उत्तर रामायण

लॉकडाऊनच्या काळात रामायण या मालिकेनंतर दूरदर्शन चॅनलने लव कुश मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लव कुश’ ही मालिका ‘उत्तर रामायण’ म्हणून ओळखली जाते. ही मालिका 19 एप्रिल पासून रात्री 9 वाजता पुन्हा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी कुश या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वप्निलने याव्यतिरिक्त रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती. 
 
ही मालिका पुन्हा प्रदर्शित होणार हे कळल्यावार स्वप्निल जोशीने ट्विट केले आहे. यात त्याने खुलासा केला की ‘कुश ही माझी पहिली भूमिका. रामायणाच्या यशानंतर दूरदर्शनने लव कूश ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 19 एप्रिलपासून रात्री 9 वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने ट्विट केले आहे.