सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (12:25 IST)

माधुरी मुलाला देते कथ्थकचे धडे

एकेकाळी चित्रपटातील आपल्या अभिनाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी माधुरी दीक्षित आजही चित्रपटतसृष्टीत आपले अढळ स्थान टिकवून आहे. आजही तितकीच फॅन फॉलोव्हिंग आहे. माधुरीच्या अभिनासोबतच तिच्या नृत्यशैलीची, मोहक अदाकारीची भुरळ आजही चाहत्यांना पडते. अनेक अभिनेत्री माधुरीसारखे नृत्य यावे यासाठी प्रयत्न करत असतात. पण माधुरीच्या या उत्कृष्ट नृत्यशैलीचे रहस्य म्हणजे तिचा रियाज.
 
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलाय. मात्र, या काळातही माधुरीने आपल्या नृत्याच्या रियाजात खंड पडू दिला नाही. उलट ती या लॉकडाउनच्या काळातील वेळ रियाज करण्यात घालवते आहे.
 
अलीकडेच मधुरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात  माधुरी घरीच कथ्थकचा सराव करताना दिसते. आणि या सरावासाठी तिला तबल्याचा साथ देतोय तिचा मुलगा अरिन. व्हिडिओमध्ये सुरुवातीला अरिन तबला वाजवताना दिसत आहे तर माधुरी पायात घुंगरू बांधून कथ्थकचा सराव करत आहे. आई आणि मुलाची सुसंगता पाहायला मिळते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा कारण काही वेळानंतर माधुरी अरिनला तिच्यासारखे नृत्य करायला शिकवत आहे.
 
माधुरी सोशल मीडियावर खूप अॅाक्टिव्ह असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ कायमच चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. या व्हिडिओवर ही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.