सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2020 (11:31 IST)

रेझीन आयडेंटिफिकेशन कोड म्हणजे काय ? प्लास्टिक वरील त्रिकोणी चिन्हाचा अर्थ काय?

आजच्या काळात सगळे काही सिंगल यूज असतं. सिंगल यूज म्हणजे काय ? म्हणजे कुठलीही वस्तू एकदा वापरली की टाकून देणे. त्याला परत न वापरणे. आजचा काळात हवाबंद(एयर टाईट) डब्यांच्या वापर जास्त वाढला आहे. त्यामध्ये प्लास्टिकचा वापर केलं जातं. हे सगळ्यांना माहितीच आहे की प्लास्टिक आपल्या पर्यावरणासाठी हानिप्रद असतं. हे आपल्या पर्यावरणाला दूषित तर करतच त्याशिवाय वेगवेगळे आजार पसरवत. आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने काही विशिष्ट पाउले उचलली आहे. यंदाच्या गांधी जयंती पासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर सरकारने बंदी घातली आहे. मग ते प्लास्टिकचे कप असो किंवा अजून काही असो. पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 
 
आपण कधी बघितले आहेत का की या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा एका भागात त्रिकोणी चिन्ह अंकित केलेले असते त्या त्रिकोणी चिन्हाचा काय अर्थ आहे. चला मग जाणून घेऊ या ह्या मागचा अर्थ ..
 
प्लॅस्टिकच्या वस्तूंवर काही त्रिकोणी चिन्ह दिसतात ते कोड चिन्हे असतात. त्या कोड चिन्हांमध्ये काही अंक दिलेली असतात. त्याला रेझीन आयडेंटिफिकेशन कोड म्हणतात. ह्या वस्तूंचा वापर किती वेळा होऊ शकतो हे त्यावर चिन्हांकित असतं. हे चिन्हांकित कोडवरील अंक 1 ते 7 पर्यंत असतात. प्लास्टिक पासून बनलेल्या या वस्तूंना 1 ते 7 पर्यंत कोड देण्यात येतात.
 
कोड 1 चा अर्थ आहे PET किंवा PETE  - ह्या कोडचा वापर शीत पेयच्या बाटल्या, ओव्हन ट्रे, डिटर्जंट, कंटेनर, गिटार, पियानो, लिक्विड क्रिस्टल, क्लीनरचे कंटेनरसाठी प्लास्टिक पॉलिमर चा वापर करण्यात येते.
कोड 2  ह्याचा अर्थ आहे HDPE - ह्या कोडचा वापर प्लास्टिक बॅग, दुधाच्या पिशव्या(पॅकेट्स),साठी हाय डेन्सिटी पॉलिथिलीन HDPE चा वापर केला जातो.
कोड 3 चा अर्थ आहे PVC - पाइप, प्लम्बिंगच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तू, शॅम्पूची बाटली, डिटर्जेंटची बाटली, क्लीनरची बाटली, माउथ वॉशच्या बाटलीसाठी PVC म्हणजे पॉलीव्हिनिल क्लोराइडचा वापर करण्यात येतो.
कोड 4 चा अर्थ आहे LDPE - खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी तसेच औषधांचा पॅकिंगसाठी याचा वापर होतो. हे प्लास्टिक फ्लॅक्सिएबल आणि पातळ असतं. कारण की हे लॉ डेन्सिटी पॉलिथिलीन LDPE असतं. या मध्ये गोष्टीचा साठा करणं सुरक्षित असतं.
कोड 5 चा अर्थ आहे PP - दह्यासाठी लागणारे कप, मायक्रोवेव्हची कंटेनर, केचपची बाटली, पाण्याची बाटली यासाठी या PP म्हणजे प्रो-पॉलिप्रोपाईलीनचं वापर केलं जातं.
कोड 6 चा अर्थ आहे PS - चहाचे डिस्पोझेबल कप, प्लेट्स तयार करण्यासाठी या PS म्हणजे पॉलिस्टायर्नचा वापर होतो.
कोड 7 - अश्या प्लॅस्टिकच्या वस्तू ज्यांचा वर कुठलेही कोड नसते त्या वस्तू या अंतर्गत येतात. याला पॉलीकार्बोनेट म्हणतात. 
1 ते 6 श्रेणी मधले असलेले प्लास्टिकचा समावेश कोड 7 मध्ये असतो.