सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (12:45 IST)

लॉकडाउनमध्ये मुलांना शिकवा बचतीचे गुण....

सध्या सर्वत्र लॉकडाउनची स्थिती आहे. आपापसातील दुरी म्हणजे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करतं लोक आपापल्या घरातच थांबत आहे. सध्याची परिस्थिती बघून सर्व काही प्रमाणात करावयाचे आहे. अश्या परिस्थितीचा सर्वात जास्त त्रास कोणाला जर होत असेल तर अश्या पालकांना होत आहे ज्यांचा घरात लहान मुलं आहे. परिस्थितीला न समजून घेणारे हे निरागस मुलं आपल्या आई वडिलांना त्रास देतात. नको ते हट्ट करतात आणि ते पूर्ण न केल्यास उच्छाद मांडतात. मुलं घरात जास्त वेळ राहू शकत नाही पण सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना घरातच डांबवून ठेवावे लागते. त्यासाठी आपल्याला त्यांना संपूर्ण वेळ द्यायला हवे आणि काही चांगल्या गोष्टी शिकवायला हव्या. 
 
असे म्हणतात की लहानपणी जश्या सवयी लावेल ते अंगीकृत होऊन जाते. तर अश्या वेळी आपण मुलांना बचत करण्याचे काही गुण सांगू आणि शिकवू या. याचा फायदा त्यांना पुढील आयुष्यात होईल आणि ते पैशांच्या महत्वाला समजतील. चला तर मग त्यांना बचतीची शिकवणी देऊ या...
 
* पिगी बँकेपासून सुरू करणे - 
मुलांना लहानपणा पासून बचतीची सवय लावायला हवी. त्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्यांचा पिगी बँकेत भर टाकावी आणि त्यांना बचतीचे धडे शिकवायला हवे. 
 
* बजेटची मांडणी करून द्यावी -
मुलांसाठी बजेट आखून द्यावे. काही वेळा असे ही होतं की मुलं हट्टीपणा करून नको त्या वस्तूंची मागणी करतात. त्यांना समजवावे आणि गरज असलेल्या वस्तूंचीच मागणी करण्यासाठी सांगावे. मुलांना चुकीचे वागण्यापासून वेळीच सावध करावे.
 
* वेळेचे निर्धारण करावे - 
मुलांना कोणत्याही वस्तूंना घेण्यासाठीची वेळ निर्धारित करून द्यावी. मुलांना शिकवणी द्या की तुला जी वस्तू पाहिजे त्यासाठी तुला पैसे जोडून ठेवावे लागणार आणि त्यासाठी त्यांना प्रेरित करावे.
 
* स्वतः:वर ताबा ठेवणे - 
मुलं मोठ्यांचे अनुसरणं करतात. त्यामुळे जर आपण जास्त उधळपट्टीपण केल्यास तेही तसेच वागतील आणि त्यांना बचतीचे महत्त्व कळणार नाही.