Exactly..मी पण हेच बोललो...
मुलगा : पापा, तुम्हाला टिचरने भेटायला बोलवले आहे..
बाप : का ?? काय झालं??
मुलगा : गणिताच्या टिचरने विचारले की, ७x९ किती होतात.. मी म्हटले ६३..
मग विचारते ९x७ किती होतात..??
बाप : काय बिनडोक प्रश्न आहे?
मुलगा : Exactly..मी पण हेच बोललो...
दुसऱ्या दिवशी
मुलगा : पापा, तुम्ही टिचरला भेटलात का ??
बाप : नाही !!
मुलगा : टिचरला भेटू नका ..
आता तुम्हाला प्रिंसीपलने भेटायला बोलवले आहे..
बाप : का ?? काय झाले ??
मुलगा : पीटी टीचर आज क्लासमध्ये बोलल्या की, उजवा हात वरती करा, मग डावा हात वरती करा, आता उजवा पाय वरती करा, मग डावा पाय वरती करा..
बाप : मग आता काय डोक्यावर उभं राहणार का ?
मुलगा : Exactly !! मी पण हेच बोललो....
तिसऱ्या दिवशी
मुलगा : पापा, तुम्ही प्रिंसीपलला भेटलात का..?
बाप : नाही !!
मुलगा : नका जाऊ.. मला एक आठवड्यासाठी काढलंय शाळेतुन..
बाप : आत्ता काय झाले ??
मुलगा : मला प्रिंसीपलच्या आँफिसमध्ये बोलवलं..तिकडे गणिताच्या टीचर, पीटी टीचर आणि हिंदी टीचर होते..
बाप : आता हिंदी टीचर तिकडे काय तमाशा बघायला आली होती.??
मुलगा : Exactly !! मी पण हेच बोललो ...