सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 18 एप्रिल 2020 (13:05 IST)

लॉकडाउनमध्ये राजकुमार राव कापतो प्रेसीचे केस

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या अफलातून अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या प्रेसीमुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो चक्क अभिनेत्री पत्रलेखाचे केस कापताना दिसतो.

लॉकडाउनमुळे घरात थांबलेला राजकुमार आपल्या प्रेसीचे म्हणजेच पत्रलेखाचे केस कापतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आठ लाखांपेक्षा अधिक नेटकरांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. ’सिटी लाईट्‌स' या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार पत्रलेखाबाबत म्हणाला होता, आमच्याबद्दल अनेक गोष्टी मला वाचायला मिळतात.



आमचे लग्न झाले असेही अनेकांना वाटते. मात्र, मला हेच सांगाचे आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये खूश आहोत. जिमबाहेर आम्ही कशाप्रकारे भांडत होतो अशा अनेक बातम्या वाचल्या होत्या. मात्र, त्यांना कधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले नाही.