शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (15:37 IST)

प्रेयसीची हत्या करून तिच्या नवर्‍याला फसवण्यासाठी लिहिली सुसाइड नोट

जालना- एका व्यक्तीने आपल्या पूर्वीच्या प्रेयसीची हत्या करून ही घटना आत्महत्या दाखवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने या प्रकारे सापळा रचला की प्रेयसीचा मृत्यू झाल्यावर तिच्या नवर्‍यावर शंका करण्यात यावी. यासाठी सचिन गायकवाड नावाच्या व्यक्तीने एक सुसाइड नोट सोडली, ज्यात लिहिले होती की पतीच्या सांगण्यावरून ती आत्महत्या करत आहे. आरोपीने महिलेची हत्या करून मृत देह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी महाराष्ट्राच्या जालना येथील रहिवासी सचिन गायकवाडला आपल्या आधीच्या प्रेयसी दीपाली रमेश शिंदे हिची हत्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की रेल्वे ट्रॅकजवळ 20 वर्षीय महिलेचा मृत देह आणि त्यासोबत एक सुसाइड नोट, तिचा सेलफोन आणि तिची दुचाकी मिळाली होती.
 
पोलिसांनी सांगितले की सुसाइड नोटमध्ये आणि आपल्या वडिलांना केलेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये पीडितेने कथितपणे आपल्या पती अविनाश वंजारेवर छळण्याचा दोषी ठरवले होते. सोबतच पीडितेने लिहिले होते की आपल्या नवर्‍यामुळे ती हे पाऊल उचलत आहे. त्यांनी सांगितले की पीडितेने सहा महिन्यांपूर्वीच अविनाशसोबत गुप्तपणे विवाह केला होता.
 
महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी अविनाश वंजारेला अटक केली होती. तथापि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळले होते की महिलेचा मृत्यू डोक्यावर वजनदार वस्तू आपटल्यामुळे झाला आहे. चौकशीत विवाहित सचिन गायकवाडचे दीपालीसह संबंध असल्याचे उघडकीस आले आणि तिच्या मृत्यूनंतर तो फरार असल्याचे समजले.
 
अधिकार्‍याने सांगितले की ज्या दिवशी दीपालीचा मृत्यू झाला त्या दिवशी क्षेत्रात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन गायकवाडसह महिला दुचाकीवर दिसली होती. चौकशीत आरोपीने स्वीकार केले की 21 डिसेंबर रोजी तो महिलेला इनिवाडी घेऊन गेला होता जिथे दोघांमध्ये वाद झाल्यावर सचिनने दीपालीचा खून केला आणि ही घटना आत्महत्या असल्याचे दाखवण्यासाठी मृत देहाला रेल्वे ट्रॅकवर फेकून आला. पोलिसांनी सचिन विरुद्ध आयपीसी संबंधी कलमांत गुन्हे दाखल केले आहेत.