शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (12:29 IST)

Flashback 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणात ही नावे राहिली चर्चेत

2019 मध्ये महाराष्ट्रचं राजकारण गरमागरम राहिलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं. 
शरद पवार
चर्चेत शीर्षवर राहिले दिग्गज नेता शरद पवार. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठ्या पराभवाचा समाना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी तूफान प्रचार केला आणि यश मिळवले. राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या. यावर्षी ईडी कार्यलयात भेट देण्याची आणि सातार्‍यामध्ये भर पावसात केलेली सभा यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. तसेच अजित पवारांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे या वर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच चर्चेत राहिले. निवडणुकीत जिंकून आल्यावर भाजप युतीत सत्तेच्या समान वाटपाच्या मुद्द्यांवरुन युती मोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत त्यांनी मुख्यमंत्री पदाची जिद्द पूर्ण केली. महाराष्ट्रात लागोपाट घडत असलेल्या या घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं.
देवेंद्र फडणवीस
दुसर्‍यांदा केवळ तीन दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून हे देखील चर्चेत होते. रातोरात अजित पवारांना आपल्याबाजूने घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणारे देवेंद्र फडणवीसांच्या भाग्याने मात्र त्यांचा साथ दिला नाही आणि तीन दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला.
अजित पवार
एका रात्रीत भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन करणारे अजित पवार तुरुपचा इक्का सिद्ध झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर केवळ तीन दिवसात पक्षातील लोकांने मन वळवले आणि त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. 
संजय राऊत
मुख्यमंत्री शिवसेनेचा हे संजय राऊत यांनी खरे करुन दाखविले. मुद्याहून जराही न वळगळता भाजपसोबत युती तोडत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांची मोठी भूमिका होती.
आदित्य ठाकरे
पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरुन वरळी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. आदित्य हे आमदारकीची शपथ घेणारे पहिले ठाकरे ठरले.
पंकजा मुंडे
निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध मैदान उतरणे तसेच पराभवाचा सामना करणे, पक्षात अंतर्गत नाराजी या सगळ्या मुद्द्यांमुळे पंकजा मुंडे चर्चेत होत्या.