बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (17:56 IST)

2019 मध्ये सर्वात चर्चेत राहणारे 5 संत

2019 हे वर्ष बऱ्याचशा घटनाक्रमांचे असून बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. धर्म क्षेत्र पण ह्यातून वळगले नाहीस. तर जाणून घ्या धार्मिक कार्यक्षेत्रात सर्वात अधिक चर्चेत असणारे संत
 
  
१. श्री श्री रविशंकर 
सुदर्शन क्रियेचे जनक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फॉउंडेशनचे संस्थापक, श्री श्री रविशंकर दर वर्षीच चर्चेत असतात. पण ह्या वर्षी अयोध्या प्रकरणात दिलेल्या आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे चर्चेत राहिले. ते दोन्ही बाजूस मध्यस्थी साठी चर्चेत होते. 8 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू आणि न्यायमूर्ती एफएम खलीफुल्ला यांना अयोध्या प्रकरणात मध्यस्थी करण्यास मान्यता दिली. श्री श्री रविशंकर आणि त्यांचे सहभागी यांनी ह्या प्रकरणाचे गहन चिंतन करून परस्पर संमतीने हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. पण बाबरी मशीद समितीच्या आडमुठेपणा मुळे ते अपयशी झाले. नंतर 6 ऑगस्ट पासून ह्या प्रकरणास दर रोज कोर्टाने सुनावणीला सुरुवात केली असून सुनावणीची तारीख निश्चित करून अयोध्या प्रकरणात निकाल दिला.
 
२  बाबा रामदेव 
ह्या वर्षी बाबा रामदेव 3 कारणास्तव चर्चेत होते. प्रथम राहुल गांधी यांचे गुणगान, दुसरे सोशल मीडिया वर त्यांच्या आरोग्यासंबंधी अफवांमुळे आणि तिसरे पतंजलीच्या विक्रमी कमाई आणि उत्पादनासाठी. 
 
सोशल मीडियावर अफवांमुळे त्यात बाबा रामदेव ह्यांचे काही राजकारण जरी नसले तरी राजकारणाचं त्याच्यांशी संबंध आहे. त्या कारणामुळे ते विरोधकांचे बऱ्याच वेळा निशाण्यांवर येतात. सुदैवाने पंतजली हे आयुर्वेदिक उत्पादन आहे. 2019 -2020 ह्या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर ह्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात विक्रमी कमाईची नोंद केली आहे. ह्या कंपनीची एकूण कमाई 3562 कोटी रुपयांवर आहे. 
 
३  सद्गुरू जग्गी वासुदेव 
जग्गी वासुदेव आपल्या क्रांतिकारक कल्पनेसाठी ओळखले जातात. ह्या वर्षी त्यांनी हिंदी भाषेत देखील आपल्या कल्पनेचा प्रसार केला. ईशा फॉउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कावेरी नदीला वाचविण्यासाठीचा प्रचार केला आहे. ह्या साठी त्यांनी 'रॅली फॉर रिव्हर' साठी मिस कॉल मोहीम राबवली. सद्गुरूने देशातील प्रत्येक समस्येवर आपले विचार मांडले आहे आणि त्यावर तोडगा सांगितला आहे. काही आध्यात्मिक गुरु आपल्या प्रदर्शनासाठी विज्ञानाचा उपयोग करतात आणि काही त्यांचा अनुभवाने तरुणांना प्रेरित करतात.
 
४ योगी आदित्यनाथ 
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरक्षपंथी संत आहे. ते गोरक्षनाथ मठाचे संत असून हजारो संत त्यांच्याशी जुळलेले आहे. ते नेहमीच वादात असतात. 2019 मध्ये अयोध्येसाठी केलेल्या कारागिरीसाठी हे प्रसिद्ध आहे. त्यांनी अयोध्येत भव्य दिवाळी साजरी करण्याची परंपरा पुन्हा जिवंत केली. ह्याच वर्षी सर्व सोयीयुक्त प्रयागराज कुंभ मेळाव्याचे भव्य आयोजन केले. ह्या भव्य मेळाव्याचे आयोजन केल्यावर देश परदेशात संतजनांचे गुणगान झाले.
 
५ शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती 
असे म्हणतात की शंकराचार्यांनी राजकारणापासून लांबच राहावे. पण स्वरूपानंद सरस्वती ह्यात अपवाद असे. ते देशातील प्रत्येक राजकीय घटनेवर फक्त लक्षच देत नसून आपली मत मांडणी करतात. त्यांची मते सत्ता पक्ष्यांच्या विरोधक असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी शिरडीच्या साईबाबांचा विरोध तसेच शनी शिंगणापूरचा विरोध पण केला होता. त्यांच्या मतानुसार महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती शनी आणि साईबाबा यांच्यामुळे आहे. 
 
2019 मध्ये राम मंदिर, सिऍबी, एनआरसी, आणि कन्यांच्या अंत्यसंस्कार आणि पिंडदान बद्दलचे दिलेले त्यांच्या विधानामुळे ते चर्चेत होते. त्यांचा मतानुसार महिला पंतप्रधान तर बनू शकतात पण महिला शंकराचार्य नाही. शंकराचार्य त्यांचा विचित्र सिद्धतांसाठी ओळखले जातात. 
 
यांच्या व्यतिरिक्त अजून अनेक संतगण आहे. त्यात प्रामुख्याने राधास्वामी सत्संगाचे प्रमुख गुरविंदरसिंग ढिल्लन, ब्रह्मकुमारी दीदी शिवानी, स्वामी गंगाकृती परिवार, आणि परमार्थ निकेतन, हृषीकेश प्रमुख चिदानंद सरस्वती, आणि दलाई लामा आहे.