शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (16:30 IST)

निर्मला सीतारमण जगातील टॉप 100 सामर्थ्यवान महिलांच्या यादीत, जाणून घ्या कोण आहे नंबर 1

न्यूयॉर्क 'फोर्ब्स'ने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एच सी एल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा, आणि बायोकॉनचे संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांना जगातील 100 सर्वात जास्त शक्तिशाली, सामर्थ्यवान महिलां मध्ये स्थान दिले आहे.
 
'फोर्ब्स' च्या 2019 मधील जगातील सर्वात जास्त शक्तिशाली, सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मन कुलपती अँजेला मर्केल ह्या प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर यूरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टीन लागार्डे असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन संसदेतील हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स नॅन्सी पेलोसी आहे.
 
दुसऱ्या यादीत बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना ह्या २९ व्या क्रमांकावर आहे.
 
'फोर्ब्स' च्या मतानुसार 2019 मध्ये महिलांनी पुढाकार घेऊन उद्योग, सरकारी कामे, सेवाभाव अश्या माध्यमात सक्रिय भूमिका बजावली आहे.
 
सीतारमण प्रथमच ह्या यादीत सामील झाल्या असून 34 व्या क्रमांकावर आहे. भारताची प्रथम अर्थमंत्री याआधी संरक्षण मंत्री देखील राहून चुकल्या आहेत.
 
रोशनी नादर मल्होत्रा ह्या यादीत 54 व्या क्रमांकावर असून त्यांचा वर एचसीएल कॉर्पोरेशनच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून $८.९ अब्ज डॉलरच्या कंपनीचे सर्व निर्णयांची जबाबदारी आहे.
 
ह्याच यादी मधील 65 व्या क्रमांकावर असलेल्या किरण मुजुमदार शॉ ह्या भारतातील सर्वात जास्त श्रीमंत महिला आहे. ह्यांनी स्वबळावर स्वतःची संपत्ती उभारली आहे.