भारतीय अर्थव्यवस्था आव्हानांना तोंड देतेय - निर्मला सीतारमण
भारत सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, असं भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. व्ही. अनंता नागेश्वरन आणि गुलजार नटराजन यांच्या अर्थविषयक पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात उपस्थितांशी संवाद साधला.
"हे पुस्तक लोकप्रिय होईलच, मात्र धोरणात्मक निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे, पुस्तकाच्या प्रकाशानाची वेळही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देतोय," असं सीतारमण म्हणाल्या.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ गेल्या सहा वर्षातली सर्वांत कमी म्हणून नोंदवली गेलीय. पहिली तिमाहीत ही वाढ 5 टक्क्यांवर आली आहे.