सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (11:25 IST)

अयोध्येतली जमीन स्वीकारण्याबाबत सुन्नी वक्फ बोर्ड 26 नोव्हेंबरला निर्णय घेणार

अयोध्या निकालात सुप्रीम कोर्टानं 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली. मात्र, ही जागा स्वीकारायची की नाही, याचा निर्णय सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून येत्या 26 नोव्हेंबरला घेतला जाणार आहे.  
 
13 नोव्हेंबर रोजीच सुन्नी वक्फ बोर्डाची बैठक नियोजित होती. मात्र, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवरबैठक पुढे ढकलण्यात आली. 26 नोव्हेंबरला बैठक होण्याची शक्यता असून, याच बैठकीत जमिनीबाबतचा निर्णय घेतला जाईल.
दुसरीकडे, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अयोध्या प्रकरणावरील निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.