शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

निर्मला सीतारमण फोर्ब्सच्या प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत

फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या या यादीत 34व्या स्थानी आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्कल सलग नवव्या वर्षी यादीत पहिल्या स्थानी आहेत.
 
युरोपीय सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्ड दुसऱ्या स्थानी तर अमेरिकेतील लोकप्रतिनिधी नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
सीतारमण यांचा पहिल्यांदाच या यादीत समावेश झाला आहे. भारताच्या पहिल्या अर्थमंत्री असलेल्या सीतारमण यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपदही भूषवले आहे.
 
रोशनी मल्होत्रा 54व्या क्रमांकावर आहेत. त्या शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. किरण मझुमदार-शॉ यादीत 65व्या स्थानी आहेत.