शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशी; आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय

महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार आहे.   

तेलंगणात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले होते. भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद अद्याप नाही. दिशा विधेयक मंजूर झाल्यानंतर आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्हयाचा तपास सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. खटलाही 14 दिवसात पूर्ण करून 21 दिवसात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.