शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (11:20 IST)

जीएसटीमध्ये कमतरता असू शकतात, पण टीकेपेक्षा सूचना करा - निर्माला सीतारामन

There may be deficiencies in GST - Nirmala Sitharaman
जीएसटीमध्ये काही कमतरता असू शकतात, मात्र या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी टीका करण्यापेक्षा जीएसटी प्रणाली अधिक चांगली करण्यासाठी सूचना कराव्यात, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.  
निर्मला सीतारामन यांनी पुण्यात सीए, सीएस, उद्योजक यांसह आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला.
 
त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, "मोठ्या कालावधीनंतर संसदेतले अनेक पक्ष आणि राज्यांच्यां विधानसभांनी एकत्रित येत काम केलं आणि जीएसटीचा कायदा आणलाय. अचानक आपण असं म्हणू शकत नाही की, किती चुकीची व्यवस्था' आहे."
 
"जीएसटीवर केवळ टीका करू नये. यामध्ये काही कमतरता असू शकतात, ज्यामुळं तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण माफ करा, कारण हा देशाचा कायदा आहे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.