शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (11:16 IST)

पंजाबमध्ये हायअलर्ट, सुरक्षाव्यवस्थेत वाढ

High alert in Punjab
पंजाब पोलिसांनी पठाणकोट आणि गुरूदासपूर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेजवळील भागातील सुरक्षेत मोठी वाढ केलीय. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) या भागात सुरू करण्यात आलंय.
 
गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी सुरक्षेत वाढ केलीय. जवळपास पाच हजार पोलीस या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.
 
पठाणकोट, गुरूदासपूर आणि बाटला येथील सर्व हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी किमान 8 बेड रिकामे ठेवावेत, असे आदेशही पठाणकोटचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपिंदर सिंग यांनी दिले आहेत.
 
पठाणकोट, गुरूदासपूरसह इतर जिल्ह्यातही हे ऑपरेशन सुरू केलं जाणार असल्याचं पंजाबचे पोलिस प्रमुख दिनकर गुप्ता यांनी सांगितलं.