मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (08:51 IST)

बाल लैंगिक शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. 
 
चाईल्डलाईन या बालहक्कांसाठी काम करणाऱ्या हेल्पलाईननं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2018-19मध्ये बाल लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक 1,742 तक्रारी केरळमधूल आल्या. त्याखालोखाल तामिळनाडूत 985, तर महाराष्ट्रातून 443 तक्रारी आल्या होत्या.
 
2018-19मध्ये भारतातील एकूण तक्रारींची संख्या 60 हजार इतकी होती. यामध्ये बाल विवाहांचं प्रमाण 37 टक्के, शारीरिक शोषण 27 टक्के, लैंगिक शोषण 13 टक्के, मानसिक शोषण 12 टक्के, तर मारहाणीचं प्रमाण 4 टक्के होतं.