शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:51 IST)

'बांगलादेशी घुसखोरांना हाकला नाहीतर...'

शहरात असलेल्या घुसखोरांना हाकला नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. देशभरात एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा यावरून तीव्र आंदोलनं सुरू आहेत.
 
सरकार या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधीपासून करणार हे अजून निश्चित झालेलं नाही. त्याआधीच पुण्यात मनसेनं शहरातील बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांना पकडून परत पाठवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.  
 
मनसेचे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. देशाची लोकसंख्या 125 कोटी असताना अजून बाहेरच्या लोकांना नागरिकत्व का द्यायचं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता. सरकार घुसखोर आणि शरणार्थी कसे ओळखणार? आधार कार्ड वापरून मतदान करू शकतो. मग आधार कार्डावर नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही. पण जे मोर्चे काढत आहेत, तोडफोड सुरू आहे, त्यांना तरी या कायद्याबद्दल नीट माहिती आहे का? भारत हा धर्मशाळा नाही. जे घुसखोर आहेत त्यांना हाकललंच पाहिजे अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.