शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (12:42 IST)

'घाडगे अँड सून' मालिकेचा शेवटचा आठवडा

मराठी टिव्ही क्षेत्रातील 'घाडगे अँड सून' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेनं 500 भागांचा टप्पा पार केला असून हा आठवडा मालिकेचा शेवटचा आठवडा असणार आहे. 
 
मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. घाडगे सदन प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासारखे वाटू लागले होते. उत्तम कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत होती. मालिकेत अमृताची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी भाग्यश्री लिमयेने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी तिनं आभार मानले आहेत.
 
मालिका निरोप घेत असल्यानं सगळ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर भावना शेअर केल्या आहेत. माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णीला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेत अक्षय-अमृताची केमिस्ट्रीची तसेच कियारा आणि वसुधा या दोघींची खलनायिकेच्या भूमिका उत्तम ठरल्या.
 
अक्षयची भूमिका साकारणारा चिन्मय उदगीरकरने म्हटले की मला या मालिकेमुळे एक दुसरं कुटुंबच मिळालं होतं आणि प्रेक्षकांचं प्रेम तर इतकं आहे की ते आता मला अकी म्हणूनच हाक मारतात.