सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:53 IST)

जमीन मोजणी होणार आता अर्ध्या तासात

मीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्य होणार आहे.  
 
सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. कॉर्समुळे हे काम अर्धा तासात होणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग अर्ध्या तासात होणार आहे. राज्यात 77 ठिकाणी कॉर्स स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार आहे. पुण्यात असं एक स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यानंतर मावळ, शिरुर, दौंड आणि पुरंदरमध्ये अशी चार कॉर्स स्टेशन्स उभारली जाणार आहेत.