मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:48 IST)

राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार, विद्यार्थिनीने केला निषेध

पुद्दुचेरी विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात सुवर्णपदक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीने राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला न गेल्याने तिने पदवी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
 
रुबीहा अब्दुररहीम असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला याआधी तिने विरोध दर्शवला होता. 
 
रुबीहाने सोशल मीडियावर नागरिकत्व कायद्याविरोधात मत व्यक्त केलं आहे. पदवीदान समारंभाला आल्यानंतर रुबीहाला विशेष पोलीस अधीक्षकांनी बाहेर बोलावून घेतलं.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं भाषण आपल्याला हॉलच्या बाहेर उभं राहून ऐकावं लागलं. मला बाहेर का काढलं याबद्दल काहीच कल्पना नसून असं का केलं, असा सवालही रुबीहाने विचारला आहे. नागरिकत्व कायद्याला केलेला विरोध, आंदोलनात भाग घेतल्यानं अशी वागणूक दिल्याची शक्यता रुबीहाने व्यक्त केली.
 
पदवीदान समारंभ झाल्यानंतर रुबीहाला हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. रुबीहाने प्रमाणपत्र स्वीकारलं परंतु राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार दिला. हॉलबाहेर काढणं हा अपमान असल्याचं रुबीहा म्हणाली.