NPRसाठी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला सांगा : अरुंधती रॉय
एनपीआरसाठी तुमचं नाव विचारण्यात आल्यावर रंगा-बिल्ला सांगा, असं वक्तव्य लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केलं आहे.
त्या दिल्लीत CAA (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) आणि NRC (राष्ट्रीय नागरिक नोंदणीपत्र) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
"जेव्हा सरकारी कर्मचारी एनपीआरसाठी तुमची माहिती घेण्यास घरी येतील तेव्हा, त्यांना तुमचे नाव रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेस कोर्स रोड असा सांगा," असं त्यांनी म्हटलंय.
भाजपनं अरुंधती रॉय यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, CAA आणि NRC विरोधात आंदोलन करताना हिंसा करणाऱ्या व्यक्तींचे पोस्टर उत्तर प्रदेश सरकारनं जारी केले आहेत. या व्यक्तींना पाहिल्यास संपर्क करा आणि त्यासाठी बक्षीस देण्यात येईल, असंही त्यात म्हटलंय.
तसंच 130 आंदोलकांना 50 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आलीये.