संबंधित माहिती
- अभिनेत्री प्रिया मलिक दिवाळी साजरी करताना भाजली
- वेव्हबँड प्रॉडक्शन्सने मिलाप मिलन जवेरी लिखित आणि दिग्दर्शित 'मस्ती 4' चे दुसरे पोस्टर प्रदर्शित केले
- अभिनेता-गायक ऋषभ टंडन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- माझ्या पहिल्या दिवाळी रिलीज थामा सोबत करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग देणं हा अविश्वसनीय अनुभव आहे!’ : आयुष्मान खुराना
- या कारणामुळे परिणीती चोप्राचा पालकांवर राग होता
प्रसिद्ध गायकावर जीवघेणा हल्ला
प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी कहलोन मृत्यूपासून थोडक्यात बचावले. त्यांच्या पोटात गोळी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी कहलोन गंभीर जखमी झाले आहे. कॅनडामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाच्या पोटात गोळी लागली. तसेच या गोळीबारामागे रोहित गोदरा गँगचा हात असल्याचे वृत्त आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोशल मीडिया पोस्टमध्ये या टोळीनेच हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पोलिस आता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, तर ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Edited By- Dhanashri Naik
