शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (17:37 IST)

दिग्गज श्री अधिकारी ब्रदर्सकडून लॉकडाऊन दरम्यान गरजू १००० कुटुंबांची काळजी घेण्या्ची घोषणा

दिग्गज श्री अधिकारी ब्रदर्सकडून मानवते प्रती सामाजिक कार्यासाठी जगप्रसिद्ध बीएपीएस स्वागमीनारायण संस्थेूसोबत सहयोगाने महामारीमुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यायन गरजू १००० कुटुंबांची काळजी घेण्या्ची घोषणा

माननीय पंतप्रधान यांनी देशाला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री अधिकारी ब्रदर्सने कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव असेपर्यंत दर महिन्याला गरजू १००० कुटुंबांची काळजी घेण्याचे वचन घेतले आहे. एकसंध व सुलभ कार्यसंचालनासाठी त्यांनी मानवते प्रती सामाजिक कार्यासाठी जगप्रसिद्ध बीएपीएस स्वामीनारायण संस्थेकसोबत सहयोग जोडला आहे.

या घोषणेबाबत बोलताना मार्कंड अधिकारी म्हनणाले, ''आपणा सर्वांवर जागतिक संकट आले आहे आणि जीवन लवकर सामान्य होण्या बाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. आपला देश या अनपेक्षित संकटाचा सामना करत आहे. आपले माननीय पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही  आमच्या परीने कार्य करत आहोत. बाह्य मदत करण्या व्यातिरिक्त आम्ही खात्री घेत आहोत की आमच्या विकासाचे आधारस्तंन असलेले आमचे कर्मचारी असंसर्गित राहतील. अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असताना देखील पगारामध्यें कोणतीच कपात होणार नाही.''

ते पुढे म्हमणाले, ''भारत देशाच्या' एकूण १.३९ बिलियन लोकसंख्ये पैकी १० टक्केन भारतीयांचे देशाच्या  ८० टक्के मालमत्तेमध्ये योगदान आहे. आज त्यांनी जबाबदारी स्वीकारत देशाचे ऋण फेडण्याखची गरज आहे. त्यांच्यापैकी ५ टक्के लोकांनी प्रत्येकी १० कुटुंबांना मदत केली तरी देशाला मोठी मदत होईल. यामुळे आर्थिक संकटाचा भार कमी होईल.''

आर्थिक मदती व्ययतिरिक्त श्री अधिकारी ब्रदर्स यांचा विश्वास आहे की, सर्वांच्याच भल्यायसाठी घरीच राहत असलेले लोक देखील देशाची मोठी सेवा करत आहेत.

लोक घरामध्ये राहत स्ववत:सोबत संपूर्ण देशाला मदत करत आहेत. अशा अवघड स्थितीमध्ये मनोबल उंच ठेवणे व सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. त्यांची सर्वात लोकप्रिय मालिका 'श्रीमान श्रीमती'चे प्रसारण सुरू झाले आहे, ज्यामुळे क्वॉरंटाइन काळामध्ये काहीसा दिलासा मिळण्यामध्ये मदत होईल. या कठीण काळामध्ये त्यांनी ''भारतीयांचे'' मनोरंजन करण्यासाठी राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनवरील त्यांच्या  मालिकेची लायब्ररी पुन्हा उघडली आहे.