बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:11 IST)

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.
 
याठिकाणी डॉक्टरांना गरज वाटल्यास ते संबंधित व्यक्तीला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतील. मात्र, यानंतर कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत. त्यासाठी रुग्णालयांचीही तीन भागात विभागणी करण्यात येईल. यापैकी पहिल्या प्रकारच्या रुग्णालयात कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यासाठीच्या रुग्णालयांत कोरोनाची मध्यम लक्षणे जाणवणाऱ्या लोकांना ठेवण्यात येईल. 
 
तर तिसऱ्या प्रकारातील रुग्णालयात कोरोनाची तीव्र किंवा गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाचा भरती करून घेण्यात येईल. रक्तदाब, मधुमेह किंवा किडनीच्या विकाराचे रुग्ण असलेल्या कोरोनाग्रस्तांवर याठिकाणी उपचार होतील. ही रुग्णालये इतर दोन प्रकारातील रुग्णालयांच्या तुलनेत सुसज्ज असतील. तसेच याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाग्रस्तांकडून रुग्णालयातील इतरांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.