गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (16:48 IST)

एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही : मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, टीकटॉकसारख्या ठिकाणी कोरोनासंदर्भातले काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कोरोनाचा संबंध एनआरसीशी जोडणं, नोटांना नाक पुसणं, थुंकणं असे प्रकार दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनवणाऱ्यांना लागलीच अटक देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे दुफळी माजवणाऱ्यांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. ‘मी कृपा करून, विनंती करतो, आवाहन करतो असं नेहमी म्हणतो ते संयमानं घरात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्या महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी मी कोणतंही पाऊल उचलू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो.

जर कुणी याचा दुरुपयोग करून नोटांना थुंकी लावून पसरवणं, इशारे देणं असा प्रकार केला, तर तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही. आपल्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी सहन करणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.