गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (22:02 IST)

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

Uddhav Thackeray
देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. अशात राज्यात संकटाचा काळ असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या लढाईत सरकारसोबत उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करत या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे असे म्हटले. या संकटाच्या वेळी जे काही कठोर निर्णय घ्यायचे असतील ते घ्यावे त्यासाठी विरोधी पक्ष आपल्यासोबत असल्याचे ते म्हणाले.
 
करोनासारख्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत मांडत आहे.