दिवसभरात ८१ नवे करोना रुग्ण; एकूण आकडा ४१६ वर
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ८१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात रुग्णांची संख्या ४१६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात १९ जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली.
मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.