मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (16:58 IST)

धारावी परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण

मुंबईतील धारावी परिसरात  कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. हा व्यक्ती मुंबई महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी (वय ५२) आहे. हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती. यादरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. सध्या या सफाई कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्का आलेल्या २३ सहकाऱ्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. 
 
या घटनेमुळे मुंबईत कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.  धारावी हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने वेळीच पावले न उचलली गेल्यास कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची भीती आहे.