शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (07:29 IST)

कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताचा असा ही सहभाग

india to contribute
करोनाच्या प्रतिबंधासाठी सक्षम लस तयार करण्याच्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सॉलिडेटरी ट्रायलमध्ये भारत सहभागी होणार आहे. भारताने ही घोषणा केली. भारताचे आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या सॉलिडॅटरी ट्रायलमध्ये आतापर्यंत भारताने सहभाग घेतला नव्हता. पण आज सहभागी होत असल्याची घोषणा केली. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे एपिडेमिओलॉजी आणि कम्युनिकेबल डिजिझचे विभाग प्रमुख रमण गंगाखेडकर यांनीही भारताचा करोनाची लस बनवण्यात सहभाग असणार असल्याचे स्पष्ट केले. आमची संख्या ही छोटी असली तरीही आमचे योगदान महत्वाचे आहे असे ते म्हणाले. सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून १० हजार व्हेंटिलेटर पुरवले जाणार आहेत. तर आणखी ३० हजार व्हेंटिलेटर मिळावेत म्हणून आम्ही मागणी केली आहे असेही त्यांनी सांगितले.