रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (11:23 IST)

WhatsApp अपडेट, आता Status वर अपलोड करु शकाल केवळ 15 सेकंदाचा व्हिडिओ

देशात लॉकडाउनमुळे सर्व आपल्या घरात आहे आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा खूप वापर करत आहेत. मोठ्या प्रमाणात लोकं वर्क फ्रॉम होम देखील करत आहे. यामुळे डेटा नेटवर्कवर अधिक दबाव वाढत आहे. अशात मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने एक निर्णय घेतला आहे. 
 
या अॅपवर आता केवळ 15 सेकंदाचा स्टे्टस व्हिडिओ लावण्याची परवानगी मिळेल. जेव्हाकि आधी 30 सेकंदाचा स्टेट्स व्हिडिओ अपलोड करता येत होता. 
 
भारतात लॉकडाउनमध्ये सर्व्हर इंफ्रास्ट्रक्चरवर ट्रॅफिक कपता करण्‍यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तरी या परिवर्तनाबद्दल व्हाट्सअॅपकडून अधिकृत घोषणा केलेली नाही. 
 
या संबंधात डब्ल्यूबीटाइंफोकडून रविवारी एक ट्वीट केले गेले होते ज्यात म्हटले होते की आपण आता 16 सेकंदाच्या व्हिडिओला व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवू शकत नाही. केवळ 15 सेकंदपर्यंतच्या व्हिडिओला परवानगी आहे.