मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (15:00 IST)

Reliance Jio ची शानदार ऑफर, डबल डेटा प्लस फ्री कॉलिंग

रिलायंस जिओच्या युजर्ससाठी कंपनी पु्न्हा एक शानदार ऑफर घेऊन आली आहे. जिओच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये डबल डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा मजा घेता येईल. 
 
टॅरिफ दरवाढ झाल्यावर युजर्सकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या 4G डेटा व्हाउचर्समध्ये बदल केले आहेत.
 
आता 4G डेटा व्हाउचरच्या बुस्टर पॅकमध्ये 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. मात्र 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये काहीही बदल केलेला नाही. 
 
जाणून घ्या प्लान
11 रुपयांच्या बूस्टर प्लानमध्ये अ‍ॅक्टिव्ह प्लॅनची व्हॅलिडिटी आणि अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 75 मिनिटं मिळतील. 
21 रुपयांच्या प्लानमध्ये अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेसह 2जीबी डेटा आणि जिओ-टू-नॉन जिओ कॉलिंगसाठी 200 मिनिटं मिळतील. 
51 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 500 मिनिटं मिळतील. या प्लॅनमध्ये मिळाणारा डेटाही 3जीबीऐवजी 6जीबी मिळेल. 
101 रुपयांच्या प्लानमध्ये 1000 नॉन-जिओ मिनिट मिळतील, याशिवाय आता 6जीबी डेटाऐवजी 12जीबी डेटा मिळेल. 
प्लानची व्हॅलिडिटी अ‍ॅक्टिव्ह प्लानइतकीच असेल. 
या सर्व प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.